Ad will apear here
Next
आरती देवगांवकर यांच्या कवितासंग्रहाचे १४ डिसेंबरला प्रकाशन
आरती देवगांवकरपुणे : कवयित्री आरती देवगांवकर यांचा ‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ हा कवितासंग्रह १४ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यात प्रकाशित होत आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे हा कवितासंग्रह प्रकाशित होत असून, सुप्रसिद्ध अभिनेते, कवी, गीतकार जितेंद्र जोशी यांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

लेखिका आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. अनघा लवळेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. ई-बुक स्वरूपातही हा कवितासंग्रह प्रकाशित होणार आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर कवितांच्या अभिवाचनाचा दृक्श्राव्य कार्यक्रमही होणार आहे.

‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ या कवितासंग्रहातील कविता मुख्यत्वेकरून काही चिंतनपर अनुभव, स्त्रीविषयक संवेदन आणि कविताविषयक धारणा या तीन आशयसूत्रांभोवती गुंफलेल्या आहेत. या सूत्रांमध्ये आत्मशोधाचा समान धागाही आहे. अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी आरती देवगांवकर यांच्या या कवितांचे ‘सत्त्वगुणी कविता’ असे वर्णन केले आहे. 

आरती देवगांवकर या लेखक, अनुवादक, फ्री लान्स संपादक आणि मुद्रितशोधक म्हणून पुण्यात कार्यरत आहेत. या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित संस्थांशी त्या निगडित असून, त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता अनेक दर्जेदार मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘अमरेंद्रकथा’ हे चरित्र त्यांनी लिहिले असून, काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. कवितालेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आरती आणि अरुण देवगांवकर, तसेच ‘बुकगंगा डॉट कॉम’चे संस्थापक मंदार जोगळेकर आणि संचालिका सुप्रिया लिमये यांनी केले आहे. 

कार्यक्रमाविषयी : 
दिवस आणि वेळ : शनिवार, १४ डिसेंबर २०१९. सायंकाळी चार ते सहा वा.
स्थळ : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, विमलाबाई गरवारे प्रशालेसमोर, कर्वे रोड, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSVCH
Similar Posts
‘बाईपणाच्या ‘डीएनए’मधून कविता येते’ : जितेंद्र जोशी पुणे : ‘कविता बाईपणाच्या ‘डीएनए’मधून येते. बायका अनेक आघाड्यांवर लढतात, अनेक गोष्टी सहन करतात, त्यांच्या त्या जगण्यातून, संघर्षातून कविता जन्माला येते. पुरुषाला बाई नावाच्या जातीमध्ये रुजून बघितल्याशिवाय हे भान येत नाही. असे रुजून बघितले तर त्याचे जगणे सार्थ होते,’ असे मत अभिनेते, कवी जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले
प्रसाद शिरगांवकरांचे लेखन सखोल आणि विचार करायला लावणारे पुणे : ‘कोणतेही लेखन माणसाला विचार करायला प्रवृत्त करत असेल तर ते कालातीत होते. तसेच लेखन वाचकांना आवडते. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेल्या तिन्ही पुस्तकांमधील लेखन हे विचार करायला प्रवृत्त करणारे आहे. प्रसाद फेसबुकवर लिहितो, तरीही हे लेखन खूपच सखोल आहे हे पाहून खूप छान वाटले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ आयटीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ डॉ
से चीज : दंत, मौखिक आरोग्याविषयीच्या डॉ. भक्ती दातार यांच्या पुस्तकाचे आठ मार्चला प्रकाशन पुणे : माणसाचा चेहरा प्रसन्न असला, की समोरच्यावर प्रभाव पाडण्याचे अर्धे-अधिक काम होऊन जाते. ही प्रसन्नता मनावर अवलंबून असते हे खरेच; पण बाह्य सौंदर्याचा विचार करायचा झाल्यास या प्रसन्नतेत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात ते सुंदर दात. दात सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी, तसेच संपूर्ण मौखिक आरोग्यच चांगले
प्रसाद शिरगांवकरांच्या तीन पुस्तकांचे २९ फेब्रुवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेली, आगळावेगळा वाचनानुभव देणारी तीन पुस्तके २९ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यात प्रकाशित होणार आहेत. ‘i-बाप,’ ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ अशी त्या पुस्तकांची नावे आहेत. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे ही पुस्तके प्रकाशित होत असून, प्रसिद्ध लेखक, आयटी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language